Tuesday, 22 February 2011

मादक दरवळमोहाच्या मादक फुलांचा,
मादक दरवळ दाट,
अंधुक थोडी पहाट पिवळी,
अंधुक थोडा घाट.

फुले वेचता चुनरीवरती,
तिच्या मृदुल डोळ्यांना,
थोड्या उघड्या गोंदण गोर्‍या,
झाकत अंगांगाना.

तिचा चुनीचा लाल घागरा,
लपझप थोडी घाई,
मोहाच्या फांदीत अडकला
- लाख जरी चतुराई.

- ना. धों. महानोर (पानझड)

No comments:

Post a Comment