Friday 15 June 2012

वाकून टाक सडा



वाकून टाक सडा,
गं राधे जरा, वाकून टाक सडा ।। धृ ।।

केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध बुचडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।१।।

शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।२।।

गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।३।।

एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।४।।

इथे ऐका ही गवळण - http://www.loksangeet.com/marathimusic/details.php?image_id=1438

1 comment:

  1. सदगुरूंची पूर्ण कृपा झाल्यावर श्री.भगवतींचीही पूर्ण कृपा त्या जीवावर होते. तेंव्हा कसे वागावे ? काय करावे म्हणजे आपली अवस्था लोकांपासून लपून राहिल. व कसे वागु नये हे श्री.महाराजांनी या अभंगातून सांगितले आहे.

    ReplyDelete