Tuesday, 22 February 2011

मर्‍हाटी भाषेचे महात्म्य !


मर्‍हाटी भाषेचे महात्म्य !

आतां सुमन देतु अवधान । धुमकुसें साहित्याचेन ।
जग भोजें नाचवीन । आनंदाचा ।।

आधींचि जगा चंदन आवडे । वरि देवाचें अनुलेपन जोडे ।
तरि कवणां वालभ न पडे । तया सुखाचें ? ।।

तैसें आइकतां श्रीकृष्णचरित्र । होय सकळ सुखाचें छेत्र ।
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र । ते मर्‍हाटी बोलैन ।।

जिये भाषेचिये रसवृत्ती । सा भाषांचे कुपे कीजेति निगुती ।
ते मर्‍हाटी कवण जाणे निरूती । जे रसांचे जीवन ।।

ते मर्‍हाटी बोल रसिक । वरि दावीन देशियेचे बिक ।
म्हणैन सव्याखान श्लोक । मिसें वोवियेचेनि ।।

- कवि नरेंद्र, रुक्मिणी स्वयंवर, रचनाकाल शके १२१३-१४.
सध्या शके १९३२ चालू आहे.
सा भाषा - संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागधी व शौरसेनी ह्या सहा भाषा.

पैशाची ही प्राचीन भारतात बोलली जाणारी प्राकृत भाषा असून ती सध्या मृत भाषा गणली जाते.

ही पिशाच्चांची भाषा असल्याची आख्यायिका वाचायला मिळते तरी यात फारसे तथ्य नसून बहुधा ही भाषा आदिवासी व राना-वनातील जमातींची बोली भाषा असावी असा तज्ज्ञांचा कया...स आहे.

गुणाढ्याचा बृहत् कथा हा ग्रंथ पैशाची भाषेत लिहिलेला होता.


* पैशाची भाषा

पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान, मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य पैशाची भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाची आणि काही प्राकृत भाषेत 'ण' नाही.

पैशाची भाषा उस प्राकृत भाषा का नाम है जो प्राचीन काल में भारत के पश्चिमोत्तर प्रदेश में प्रचलित थी। पश्तो तथा उसके समीपवर्ती दरद भाषाएँ पैशाची से उत्पन्न एवं प्रभावित हुई पाई जाती हैं। 

No comments:

Post a Comment